कोणाच्या नावावर किती जमीन? या पद्धतीने एका क्लिकवर मिळवा संपूर्ण माहिती Land records

Land records घर-बंगला, जमीन किंवा प्लॉट खरेदी करणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. प्रत्येकाला वाटतं की, त्याचं स्वतःचं आलिशान घर असावं. लोक गुंतवणुकीच्या हिशोबानेही प्रॉपर्टी मध्ये पैसे लावतात. मात्र मोठ्या प्रमाणात होत असलेल्या रजिस्ट्री दरम्यान फसवणुकही मोठ्या प्रमाणात होते. तुम्ही पाहिलं असेल की, एकाच प्लॉटची रजिस्ट्री अनेक लोकांच्या नावावर असते. अशा वेळी अनेकदा तर लोकांच्या हातून पैसा आणि प्रॉपर्टी दोन्हीही निघून जातं. यामुळे कोणतीही जमीन खरेदी करण्यापूर्वी पूर्ण माहिती काढणं आणि चौकशी करणं गरजेचं असतं. पहिले तुम्हाला जमीन खरेदी करण्यासाठी तलाठी कार्यालयात जमीन मालकाची माहिती घ्यावी लागत असे. मात्र आता महसूल विभागाने डेटा ऑनलाइन केला आहे. याचा फायदा असा की, लोकांना आता जमिनीचा मालक जाणून घेण्यासाठी तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही. ऑनलाइन प्रक्रियेद्वारे तुम्ही भू नकाशा,भुलेख, खाते उतारा इत्यादींच्या नोंदी तपासू शकता. Land records

ऑनलाईन पद्धतीने रेकॉर्ड कसे तपसायचे?

सर्वप्रथम, तुम्हाला राज्य महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. आता तुमच्या जिल्ह्याचे नाव निवडा. त्यानंतर तहसीलचे नाव निवडावे लागेल. आता तुम्हाला ज्या गावाची जमिनीविषयी जाणून घ्यायचे आहे. त्या गावाचे नाव निवडा.जमिनीच्या माहितीशी संबंधित पर्यायांमधून ‘खातेदाराच्या नावाने शोधा’ हा ऑप्शन निवडा. आता जमिनीच्या मालकाच्या नावाचे पहिले अक्षर निवडा आणि सर्च बटणावर क्लिक करा.

दिलेल्या लिस्टमधून जमिनीच्या मालकाचे नाव निवडा. आता Captcha Code Verify टाका. व्हेरिफाय होताच स्क्रीनवर अकाउंटचे डिटेल्स ओपन होतील. यामध्ये खाते क्रमांकासह त्या खातेदाराच्या नावावर किती जमीन आहे याची सर्व माहिती तुम्ही पाहू शकता.

Leave a Comment