गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या व कुक्कुटपालन अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज सुरू Goat Distribution Scheme

Goat Distribution Scheme महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजना 2025 अंतर्गत शेळी गट वाटप, दुधाळ गाई-म्हशी आणि मांसल कुक्कुटपक्षी वाटप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनांचा उद्देश ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि शेती पूरक व्यवसायास चालना देणे हा आहे.

शेळी गट वाटप योजना 2025 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 10 शेळ्या व 1 बोकड किंवा 10 मेंढ्या व 1 नर मेंढा अनुदानावर दिल्या जातात. उच्च प्रतीच्या शेळ्यांसाठी प्रति शेळी ₹8000, तर बोकडासाठी ₹10000 इतके अनुदान उपलब्ध आहे. स्थानिक पैदाशीच्या शेळ्यांसाठी अनुक्रमे ₹6000 व ₹8000 अनुदान दिले जाते. Goat Distribution Scheme

दुधाळ गाईसाठी प्रती गाय ₹70000 व म्हशीसाठी ₹80000 इतके अनुदान मिळते. यामध्ये जीएसटी व विमा यांचा समावेश असून अर्जदाराच्या श्रेणीनुसार शासनाकडून 50% ते 75% पर्यंत अनुदान दिले जाते. अनुसूचित जाती-जमातीच्या लाभार्थ्यांना अधिक लाभ मिळतो.

या योजनांतर्गत कुक्कुटपालन शेड व साहित्य खरेदीसाठीही अनुदान दिले जाते. 1000 चौरस फुट क्षेत्रात शेड तयार करण्यासाठी आणि आवश्यक उपकरणांसाठी एकूण ₹2.25 लाखांचे अनुदान देण्यात येते.

या योजनेसाठी पात्रता खालीलप्रमाणे आहे

  • सुशिक्षित बेरोजगार युवक
  • महिला बचत गट
  • अल्पभूधारक व अत्यल्पभूधारक शेतकरी
  • दारिद्य रेषेखालील लाभार्थी

योजनेसाठी AH-MAHABMS वेबसाईट किंवा अधिकृत मोबाईल अॅपचा वापर करून ऑनलाईन अर्ज करता येतो. अर्ज करताना फोटो व सही अपलोड करावी लागते, तर अर्ज करम्यासाठी 7/12, 8अ, जातीचा दाखला, संमतीपत्र यासारखी कागदपत्रे सादर करावी लागतात.

या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 जून 2025 असून पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपला अर्ज सादर करावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे. Goat Distribution Scheme

Leave a Comment