Crop Insurance yojana खरीप हंगाम-२०२४ मध्ये पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना एकूण ३ हजार ७२० कोटी रुपये विमा भरपाई मंजूर झाली. त्यापैकी ९ मे पर्यंत ३ हजार १२६ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. आणखी ३०७ कोटी रुपये शेतकऱ्यांना लगेच मिळणार आहेत. तर २८७ कोटी रुपये राज्य सरकारने पीकविमा कंपन्यांना विम्याचा दुसरा हप्ता दिल्यानंतर मिळणार आहेत.
शेतकऱ्यांना सध्या खरीप हंगाम-२०२४ मधील वेगवेगळ्या ट्रीगरमधून भरपाई मंजूर करण्याचे काम सुरु आहे. राज्य सरकारने आपल्या हिश्श्याचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रीगरमधून भरपाई जमा केली जात आहे. काढणीपश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई राज्याने आपला दुसरा हप्ता विमा कंपन्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल.
शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणीपश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई या चार ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली आहे. शेतकऱ्यांना ९ एप्रिलपर्यंत ३ हजार ७२० कोटी रुपये भरपाई मंजूर करण्यात आली. Crop Insurance yojana
पण राज्याने केवळ पहिला हप्ता दिल्यामुळे नियमानुसार कंपन्या स्थानिक नैसर्गिक अपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रीगरमधून मंजूर भरपाईच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करत आहेत. या दोन ट्रीगरमधून मंजूर भरपाई ३ हजार ४३३ कोटी रुपये आहे. त्यापैकी ९ एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ३ हजार १२६ कोटी रुपये जमा करण्यात आले. तर ३०७ कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरु आहे. Crop Insurance yojana
चार जोखीम बाबींमधून मंजूर भरपाई
२७२० कोटी
स्थानिक आपत्ती
७१३ कोटी
हंगामातील प्रतिकूल परिस्थिती
२७० कोटी
काढणी पश्चात नुकसान
१८ कोटी
पीक कापणी प्रयोग आधारित
वितरित नुकसान भरपाई
२४१८ कोटी
स्थानिक आपत्ती
७०८ कोटी
हंगामातील प्रतिकूल परिस्थिती